मुंबई : राज्यभरातील बहुतांश भागात पावसाने मारलेल्या लांब दडीने बळीराजा मोठ्या संकटात सापडल आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रभरात आता दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. एकीकडे पावसाचे चिन्ह दिसत नासातांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हाएकदा उकाड्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तर सध्या अनेक जिल्ह्यात वाढत्या उकाड्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येतो आहे.
एकट्या नाशिक जिल्ह्यात या महिन्यात पावसाची तब्बल ७० टक्के तूट नोंदविली गेली आहे. गेल्या १५ दिवसांत कमाल तापमानात सात अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती आहे. तर तिकडे छत्रपती संभाजी नगरमध्ये ३५.८ अंश इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. सप्टेंबर महिन्यात नोंदवलं गेलेले हे मागील २५ वर्षांच्या तुलनेतलं हे उच्चांक तापमान असल्याची माहिती आहे. शहरातील सातत्याने तपमान ३० अंशाच्या पुढे असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.
राज्यातील चार जिल्ह्यात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पार
दरम्यान, रविवारी राज्यातील चार जिल्ह्यात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर आणि अमरावतीमध्ये रविवारी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील अकोल्यात ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी आगामी काळात देखील तपामाना पार वाढत राहण्याचे संकेत आहे. परिणामी नागरिकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येतो आहे.